डोणे (ता.मावळ) : पवन मावळातील डोणे येथील एकता प्रतिष्ठाण आयोजित डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. एकता प्रतिष्ठाणच्या माध्यमातून डोणे आणि परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित “उत्सव ग्रामदैवतेचा, सन्मान स्त्रीशक्तीचा” माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.
गेली दोन वर्ष एकता प्रतिष्ठाण संपूर्ण महिला कार्यकारणीची निवड करत संपूर्ण जिल्ह्यात एक चांगला पायंडा पाडला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त महिलां भगिनींनीचा सन्मान करत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नवनियुक्त कार्यकारिणीपुढील प्रमाणे;
अध्यक्षा चैत्राली लांडगे, उपाध्याक्षा स्वाती आरुठे, कार्याध्यक्षा मिना चांदेकर, खजिनदार वंदना घारे, सहखजिनदार शशिकला घारे, सचिव पुनम खराडे, सरचिटणीस अनिता घारे, सदस्या मिना कारके, करिना कारके, रुपाली घारे, शारदा कारके, मंगल वाघमारे, स्वाती सुतार, सपना सातव, सिंधु लोहकरे
सदर कार्यकारिणीची निवड करताना उपस्थितांमध्ये एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक – बाळासाहेब घारे, अध्यक्ष योगेश कारके, उपाध्यक्ष रविंद्र काळभोर, कार्याध्यक्ष विशाल कारके, सचिव मल्हारी खिलारी, खजिनदार विश्वास चांदेकर, पोलिस पाटील उमेश घारे, सदस्य वैभव कारके, रणजित खिलारी, सागर चांदेकर, समीर खिलारी, संदेश चांदेकर, तुषार घारे, संग्राम कारके आणि एकता प्रतिष्ठाणचे सर्व सभासद उपस्थित होते. ( chaitrali landge has been elected as president of navratri utsav committee done village maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहरचा पाठींबा
– मावळ तालुक्यातील तक्रारी असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार
– खाकीला डाग! 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा, महिलेची तक्रार