पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. कोरोनानंतर यंदा दोन वर्षांनी मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ( Change In Traffic On Pune Nagar Highway Route On 31st December To 1 January For Bhima Koregaon Vijaystambha )
एक जानेवारी 2023 रोजी जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना सोडण्यात येणार आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे
- शिक्रापूर ते चाकण अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार.
- पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने खराडी बायपास चौकातून हडपसरमार्गे वळविण्यात येणार. ही वाहने पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, नगर रोड अशी जाणार.
- अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोडमार्गे पुण्याकडे येतील.
- मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर जातील.
- कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणारी वाहने हडपसर – पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील.
- जयस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना सोडण्यात येणार. पार्किंग ठिकाणापासून जयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीच्या बसची सोय.
पार्किंगची ठिकाणे खालील प्रमाणे
- दुचाकींसाठी पार्किंगची ठिकाणे – तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे मेन चौक, टाटा मोटर्स शोरुमचे मोकळे मैदान, टाटा मोटर्स शोरुमशेजारील मोकळे मैदान, पेरणे पोलीस चौकी मागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गो शाळेच्या शेजारील प्लॉट
- कार पार्किंगची ठिकाणे – ‘आपले घर’च्या शेजारील हनुमंत कंद यांचा प्लॉट, सातव यांचा प्लॉट, ‘आपले घर’शेजारील प्लॉट, लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी सागर गायकवाड यांचा प्लॉट, तुळापर फाटा स्टफ कंपनीशेजारी मोकळा प्लॉट, सोमवंशी ॲकॅडमीसमोर, खंडोबाचा माळ, तुळापूर रोड वाय पॉइंट, फुलगाव सैनिकी शाळा मैदान
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स करिता मावळ तालुक्यात आरटीओचा मासिक दौरा
– मोठी बातमी! क्रिकेटपटू रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; पाय मोडल्याची भीती