Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ताजे गावचे सुपुत्र चेतन दत्ता केदारी याची नुकतीच महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यासह रत्नागिरी जिल्ह्यात त्याची पोस्टिंग करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका छोट्याशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील चेतन केदारी याने अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काम, व्यवसाय सोबत अभ्याल करत ग्रामविकास अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल चेतन केदारी याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. चेतनचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय भाजे येथे झाले. चेतन कृषी पदवीधर असून डी. वाय. पाटील कॉलेजमधून कृषीची पदवी घेतली आहे. कॉलेजनंतर काम करत अभ्यास केला. काही महिने व्यवसाय केला. नशिबाने तीन-चार वेळा कमी मार्गाने अपयश आले. परंतु जिद्दीच्या जोरावर यावेळी त्याने खुल्या प्रवर्गातून ग्रामसेवक अधिकारी पद प्राप्त केले. ( Chetan Kedari from taje village of Maval taluka became village development officer )
ग्रामविकास विभागाकडून आयबीपीएस संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा एकूण 200 गुणाची होती. ज्यात मराठी 30 गुण, इंग्लिश 30 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 30 गुण, बुद्धिमत्ता आणि गणित 30 गुण व तांत्रिक घटक 80 गुण अशी रचना होती. यामध्ये चेतन उत्तीर्ण झाले असून ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्त झाले आहे.
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम ! ऑफबीट फाउंडेशन तर्फे भाजे येथील संपर्क बालग्राम मधील मुलींसाठी आवश्यक साधनसामग्रीची भेट
– मावळ तालुक्यातील पहिल्या दुर्गसंवर्धन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News
– महत्वाचे ! वस्तू खरेदी करताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही, समजून घ्या नियम