चारचाकी गाडी रिव्हर्स घेताना अनेकदा अंदाज न आल्याने चालकांकडून अपघात होत असतात. मात्र, आता समोर आलेला एक अपघात चालक वर्गासह पालकांनाही जागं करणारा आहे.
घराजवळ खेळत आहे म्हणून बालकाकडे दुर्लक्ष केलेले पालक आणि गाडी रिव्हर्स घेताना चालकाने हवी ती दक्षता न घेतल्याने एका बालकाला आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. ( Child Dies After Being Crushed Under Tyre When Reversing The Truck )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खालापूरच्या रसायणीत बॅलन्स बिल्डिंगच्या मागे ट्रक चालकाने ट्रक रिव्हर्स घेताना काळजी न घेतल्याने एका दोन वर्षांचा मुलगा टायरखाली चिरडला गेलाय. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. रसायनी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून याप्रकरणी पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.
मात्र, हा अपघात सर्वांनाच झोपेतून जागं करणारा आहे. चालकांनीही गाडी चालवताना, थांबवताना किंवा पार्क करताना दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पालकांनाही लहान मुलांवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. लहान मुले घराजवळ खेळतायेत म्हणून सहसा पालकवर्ग त्यांच्याकडे लक्ष देत नाही. शेजारच्या किंवा घरातीलच मुलांबरोबर लहान मुले घराच्या आसपास खेळत असतात, अशावेळी पालक वर्ग त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. मात्र, अशावेळीही पालकाच्या दुर्लक्षामुळे छोटे मोठे अपघात होऊ शकतात.
अधिक वाचा –
– सरपंचपदाच्या उमेदवार महिलेच्या पतीचा प्रचारादरम्यान मृत्यू; गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतूक
– धक्कादायक! सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन फेविस्टिकने केले बंद
– मोठी बातमी! ‘कुणीही लगेच दावा सांगू नका’, सीमावादावर अमित शाहांच्या दरबारी तात्पुरता तोडगा, वाचा सविस्तर