मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लग्नाहून परतीच्या मार्गावर असलेल्या वऱ्हाडाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ बोरघाटात मुंबई लेनवर हा अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने बसला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात बसचा चालक मृत्यू पावला आहे. ( One Killed In Horrific Accident Involving Travel Bus And Container On Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार बसमध्ये एकूण 35 प्रवासी होती, पैकी 18 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत, महामार्ग पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था या यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि मतकार्य सुरु केले.
बस चालकाचा जागी मृत्यू झाला, तर जखमी तीन प्रवासी आणि एका गंभीर जखमीला एमजीएम रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. तर किरकोळ 10-12 जखमींवर ऑन स्पॉट उपचार करण्यात आले. तसेच,खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात एकूण सहा प्रवाशांवर उपचार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, शहापूर-वाशिंद येथील प्रवासी बसमधून लग्नासाठी सिंधुदूर्गला गेले होते, कोल्हापूरमार्गे माघारी परतत असताना बोरघाटात त्यांच्या बसचा अपघात झाला. कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
अधिक वाचा –
– नागरिकांनो… मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाण्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर पाहा
– धक्कादायक! सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन फेविस्टिकने केले बंद
– फिफा वर्ल्डकप फायनल । लिओनल मेस्सीने रचला इतिहास, तब्बल 36 वर्षांनी अर्जेंटिना संघ बनला विश्वविजेता । FIFA World Cup Final