इंदोरी गावच्या माजी उपसरपंच लतिका नीलेश शेवकर यांच्या वाढदिवसानिमित्त, लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यकर्ते नीलेश मच्छिंद्र शेवकर यांच्या वतीने इंदोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पानसरे वस्ती आणि कुंडमळा येथे शाळांमध्ये संगणक संच भेट देऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ वडगावचे अध्यक्ष प्रशांत गुजराणी होते. यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, केंद्र प्रमुख बनकर, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिलीप ढोरे, माजी उपसरपंच प्रशांत भागवत, बाळकृष्ण पानसरे, धनश्री काशीद, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोरे, मधुकर शिंदे, जयश्री सावंत, बेबी बैकर, रेश्मा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शेवकर, रणजीत हिंगे आदी उपस्थित होते. ( Children will get computer education in primary school gift of computer sets to two schools in Indori Maval )
पुढील काळामध्ये शाळेच्या मुलांच्या दृष्टीने उपयुक्त असे उपक्रम राबविण्याचे आश्वासन अध्यक्षीय मनोगतात प्रशांत गुजराणी यांनी दिले. याप्रसंगी माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, धनश्री काशीद, केंद्र प्रमुख भगवान बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित भोगील, नवनाथ दिवटे यांनी केले. माजी उपसरपंच लतिका शेवकर यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– “आप्पा.. आता तुम्ही थांबू नका” , मावळ भाजपा कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा चेहरा – रविंद्र आप्पा भेगडे
– महिला, युवक, पोलीस अधिकारी सर्वांनीच केले रक्तदान ; खोपोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News
– वडगावात दोन जखमी मोरांना जीवदान । Vadgaon Maval