भडवली (ता. मावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी साकारण्यात आलेल्या बाल उद्यान आणि मुलांच्या मध्यान्ह भोजनाच्या व्यवस्थेसाठी बांधण्यात आलेल्या स्वयंपाक ग्रह खोलीचे उद्घाटन पोस्को इंडिया लिमिटेड प्रोसेसिंग सेंटर नवलाख उंबरे या कंपनीचे एमडी गन बे किम यांच्या हस्ते करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून रयत फाउंडेशन पुणे यांनी मिळवली शाळेतील मुलांसाठी विविध खेळणी, लॉन,अद्ययावत स्वयंपाक गृह खोली बांधकाम मागील दोन महिन्यांमध्ये पूर्ण केले. कंपनीचे जनरल मॅनेजर संतोष देशमुख यांनी सदर प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट करताना मुलांना शाळेच्या वेळेत मुक्तपणे खेळता बागडता यावे तसेच मुलांना मध्यान भोजनासाठी पिण्याच्या पाण्यासह सुसज्ज स्वयंपाक गृह खोली वापरता यावी, यासाठी कंपनीने सीएसआर फंडातून हे काम केलेले आहे. त्याचा मुलांना नक्कीच चांगला उपयोग होईल, अशा भावना व्यक्त केल्या. ( Childrens Garden for the students of Zilla Parishad School in Bhadvali Maval )
याप्रसंगी मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य रघुनाथ लोहर, संभाजी लोहार, कंपनीच्या एच आर नेहा वाकचौरे, पृथ्वीराज देसाई, राणी कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पूजा संतोष लोहार, अमर लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…
– इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला, जलपर्णीत अडकला होता मृतदेह, शिवदुर्गच्या शोध मोहिमेला यश
– खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात बसले होते लपून । Pune Crime