Dainik Maval News : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाखाची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.4) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालय येथे ही कारवाई केली.
सुरेंद्र साहेबराव जाधव (वय 56) असे रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वालेकरवाडी येथील 53 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
- तक्रारदाराने वाल्हेकर वाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 4 लाख 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चिंचवड मंडलाधिकारी कार्यालय येथे सापळा लावला. मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी लाचेचे चार लाख रुपये स्वीकारले. लाचेची ही रक्कम जाधव यांनी पार्किंग मधील कारमध्ये ठेवत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. गाडीमधून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन