व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विजेच्या लपंडावाने वडगावकर त्रस्त, तालुक्याचे ठिकाण असुनही महावितरणचे दुर्लक्ष ; उद्योग, व्यवसाय, कामकाजावर परिणाम

सातत्याने विजपुरवठा खंडित होत असल्याने वडगाव मावळ शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Power supply interrupted

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सातत्याने विजपुरवठा खंडित होत असल्याने वडगाव मावळ शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वेळी अवेळी कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय शहरात विज गायब होत असल्याने सामान्य नागरिकांसह, लहान मोठ्या उद्योजक व्यवसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याचे ठिकाण असुनही महावितरणकडून शहराला सुरळीतपणे विजपुरवठा करणे शक्य होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वडगाव मावळ शहरात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असून याचा स्थानिक उद्योग-व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. शिवाय, महसूल केंद्र असलेल्या वडगावातील दैनंदिन कामकाजाचा खोळंबा होत आहे. रविवारी रात्री (दि.२३) आणि सोमवारी सकाळपासून शहरातील वीजपुरवठा ठप्प होता. तर मंगळवार सकाळपासून पुन्हा विजेचे येणे – जाणे सुरू झाले आहे, यामुळे नागरिक संतप्त झालेत.

  • शहर परिसरात कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वडगावात तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक, तलाठी कार्यालय, सत्र न्यायालय, सहायक निबंधक कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ येथे आहे. त्यामुळे तालुक्याभरातून आलेल्या नागरिकांची मोठी वर्दळ येथे असते. अशावेळी सतत वीज पुरवठा खंडित झाल्याने या सर्वांचीच गैरसोय होत आहे.

तर, सकाळपासून विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडणींचा सामना करावा लागत आहे. यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्यापासून ते विजेची उपकरणे वापराविना कामे उरकावी लागत आहेत. यामुळे गृहिणी त्रस्त आहेत. सध्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. अशावेळी अचानक वीज जाण्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे.

एकीकडे कामाचा खोळंबा आणि दुसरीकडे कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अशावेळी विजेच्या अभावी नागरिकांना उष्म्यात दिवस काढावा लागत आहे. घरात विजेची उपकरणे असूनही ऐन दुपारी तर कधी कधी सायंकाळी विज गायब होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. महावितरणचे अधिकारी, विज वाहक वाहिनीची कारणे देत प्रत्येकवेळी वेळ सारून नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यावर अधिकाऱ्यांना कोणतेही ठोस उपाययोजना करता येत नाही, हेच सत्य आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

‘पीएमआरडीए’ हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘रिंग रोड’सोबत कनेक्टिव्हिटी वाढविणार ; 15 ‘इंटरचेंज’चा प्रस्ताव, 145 कोटींचा खर्च अपेक्षित

Next Post

शाब्बास..! पहिल्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळच्या वैष्णव आडकरने जिंकले सुवर्णपदक । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vaishnav Adkar from Maval won gold medal in first Greco-Roman Maharashtra Kesari wrestling tournament

शाब्बास..! पहिल्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळच्या वैष्णव आडकरने जिंकले सुवर्णपदक । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.