व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पीएमआरडीए’ हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘रिंग रोड’सोबत कनेक्टिव्हिटी वाढविणार ; 15 ‘इंटरचेंज’चा प्रस्ताव, 145 कोटींचा खर्च अपेक्षित

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित ‘रिंग रोड’ची कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 24, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित ‘पुणे रिंग रोड’ची ( Pune Ring Road ) कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येणार आहे. यासाठी रिंग रोडला जोडणारे पंधरा महत्त्वाचे इंटरचेंज विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 145 कोटींचा खर्च अपेक्षित असून यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

‘पीएमआरडीए’चे भौगोलिक क्षेत्रफळ 6 हजार 246.26 चौरस किलोमीटर इतके आहे. त्यामध्ये 9 तालुके आणि 697 गावांचा समावेश आहे. त्यानुसार पुणे आणि परिसरातील दळणवळण गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांसाठी ‘पीएमआरडी’ने त्यांच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतुदी केल्या आहेत.

  • नियोजित वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड), पुणे-सातारा आणि पुणे-नगर रस्त्यापासून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला ‘कनेक्टिव्हिटी’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच, ‘रिंग रोड’ला जोडणारे 15 इंटरचेंज विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत चांदखेड ते कासारसाई, मुठा टाॅप ते उरावडे आणि निघोजे ते मोई या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्याअंतर्गत तीन नवे रस्ते बांधण्याचे नियोजित आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ‘रिंग रोड’ प्रस्तावित आहे. गतिमान दळणवळणाच्या दृष्टीने त्याला गती देण्यात येणार आहे. मावळ, खेड, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा आणि मुळशी या नऊ तालुक्यामधून प्रस्तावित रिंग रोड जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन इंटरचेंज तयार करण्याचे नियोजित आहे.

एकूण 15 ‘इंटरचेंज’मध्ये 12 इंटरचेंज यापूर्वीच अस्तित्वात आहेत. तर तीन नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत एकूण 12.10 किलोमीटर लांबीचे रस्ते ‘रिंग रोड’शी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होऊन दळणवळणाची गती वाढेल, असा दावा ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आला आहे.

नव्याने उभाण्यात येणारे इंटरचेंज : ( रस्त्याचे नाव – अंतर – खर्च )
1. मूठा नदी टाॅप ते उरावडे – 3.5 किलोमीटर – 19.25 कोटी
2. चांदखेड ते कासारसाई – 5 किलोमीटर – 50 कोटी
3. निघोजे ते मोई – 3.6 किलोमीटर – 75 कोटी

1 लाख 26 हजार कोटींचा खर्च अपेक्षित –
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण 2 हजार 550 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. त्यासाठी 1 लाख 26 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या एकात्मिक आराखड्यात पुरंदर विमानतळापर्यंतचा ‘कनेक्ट’ वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिका, पीएमपीचे नवे मार्ग, पीएमपीचे टर्मिनल, रेल्वे जोड मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

‘रिंग रोड’ला जोडणारे 15 ‘इंटरचेंज’ विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात मंजुरी घेण्यात आली असून, त्यासाठी 145 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. – डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


dainik maval jahirat

Previous Post

शिक्षक परिषद मावळच्या अध्यक्षपदी राम कदमबांडे, तर कार्यवाहपदी देवराम पारीठे यांची निवड ; पाहा संपूर्ण नूतन कार्यकारिणी

Next Post

विजेच्या लपंडावाने वडगावकर त्रस्त, तालुक्याचे ठिकाण असुनही महावितरणचे दुर्लक्ष ; उद्योग, व्यवसाय, कामकाजावर परिणाम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Power supply interrupted

विजेच्या लपंडावाने वडगावकर त्रस्त, तालुक्याचे ठिकाण असुनही महावितरणचे दुर्लक्ष ; उद्योग, व्यवसाय, कामकाजावर परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.