Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेने लागू केलेल्या 30 टक्के पाणीपट्टी कर वाढीला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. ही कर वाढ तत्काळ रद्द करावी, स्वच्छता विभागाचे लागू केलेले टेंडर रद्द करावे, खासगी कंपनीला देण्यात आलेला कामाचा ठेका काढून घ्यावा आदी मागण्यांसाठी शहरात लोणावळा जागरूक नागरिक मंचाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
लोणावळा शहरात मंचच्या माध्यमातून मागील आठवड्यात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना रजेवर पाठविण्यात आले. मात्र, मुख्याधिकारी यांनी पदावर असताना नागरिकांच्या पाणी पट्टीमध्ये 30 टक्के कर वाढ केली असून ही कर वाढ करताना शहरातील नागरिकांना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप करीत मंचच्या वतीने ह्या कर वाढीला विरोध होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी राबविलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद ; दररोज हजारोंची गर्दी
– वडगाव शहर बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणास स्थानिक व्यावसायिकांचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval
– मावळ तालुक्याला मिळाले नवीन गटविकास अधिकारी, के. के. प्रधान यांची मावळ पंचायत समितीत बदली । Maval News