“वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा” हे अभियान पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आणि पहिला टप्पा दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी एकविरा गड आणि कार्ला लेणी येथील स्वच्छ्ता करून सुरू करण्यात आला. त्यावेळी अभियानामध्ये 400 पेक्षा जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला, अशी माहिती लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली. ( Cleanliness campaign at Lohgad Fort on May 3rd by Pune Rural Police Force Said IPS Sathyasai Karthik )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, आता या अभियानाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. यात लोहगड किल्ला परिसर इथे दिनांक 3 मे 2023 रोजी सकाळी 6.00 वाजता स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली असून त्याकरिता पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून गूगल फॉर्म भरुन घेतले जात आहे. सदर अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी हा फॉर्म दिनांक 2 मे 2023 रोजीपर्यंत भरून द्यावा, असे आवाहन IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेतील ‘फ्युचरिस्टिक कॉम्प्युटर क्लासरूम’चे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
– इंद्रायणी नदीवरील वाडिवळे येथील पुलाच्या कामास सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन