तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) शहरातील हत्या प्रकरणामुळे संपूर्ण मावळ तालुका ( Maval Taluka ) पुन्हा एकदा हादरला आहे. एका महाविद्यालयीन तरुणाची रात्रीच्या वेळी 15 ते 20 जणांच्या टोळक्याने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रणव अनिल मांडेकर (वय 20 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात ( Indrayani Mahavidyalay ) हा तरुण पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. ( College Youth Killed In Talegaon Dabhade Maval Taluka Crime )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, पुर्ववैमन्यसातून हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेला प्रणव मित्रांसोबत बाहेर होता, तेव्हा अचानक शस्त्र घेऊन काहीजण त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर तो धावत सुटला. मात्र, टोळक्याने त्याचा पाठलाग करुन त्यावर वार केले, यात तो मृत पावला. तर आणखीन एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी
– मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, 1 जागीच ठार, 2 गंभीर