नाट्य दिग्दर्शक आणि लेखक ॲड. विनय दाभाडे लिखित ‘स्वातंत्र्य समर’ हे महानाट्य तळेगाव दाभाडे येथे येत्या 1 ते 4 डिसेंबर रोजी सादर करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील 350 कलाकारांचा या महानाट्यात समावेश असणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर हे प्रयोग होणार आहेत. सुमारे 25 हजार प्रेक्षकांची या महानाट्याला उपस्थिती असेल, अशी माहिती नियोजन समितीचे प्रमुख गिरीश खेर आणि रवींद्र दाभाडे यांनी गुरुवारी (दिनांक 3 ऑक्टोबर) रोजी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नियोजन समितीचे अध्यक्ष सुबोध दाभाडे, दीपक दाभाडे, हेमंत दाभाडे, नितीन दाभाडे आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांपूर्तीचे औचित्य साधून विद्यार्थी आणि युवा पिढीला स्वातंत्र्य लढ्याबाबत माहिती व्हावी आणि प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे महानाट्य सादर करण्यात येणार असल्याचे ॲड. दाभाडे यांनी सांगितले. 8 हजार विद्यार्थ्यांना हे महानाट्य मोफत पाहता येणार आहे. लोकसहभागातून सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान आणि शिव सह्याद्री महानाट्य परिवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली. ( Swatantryasamar Drama at Talegaon Dabhade in December )
अधिक वाचा –
– अॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न, माजी विद्यार्थी निलेश गराडेंचा विशेष सन्मान
– सह्याद्री प्रतिष्ठान आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून 45 विद्यार्थ्यांना किल्ले लोहगड दुर्गदर्शन