Dainik Maval News : वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील 18 जोडपी विवाहबद्ध झाली.
वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याची सुरुवात श्रींच्या अभिषेकाने झाली. साखरपुडा प्रसंगी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका सुनील शेळके, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, जिल्हा नियोजनचे माजी सदस्य अविनाश बवरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
त्यानंतर वधू वरांचा हळदी समारंभ, वऱ्हाडी मंडळींचे भोजन तसेच नवरदेवांची भव्य मिरवणूक पार पडली. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकारी व वऱ्हाडी मंडळींसह ट्रेडिंग ग्रुपच्या 15 सदस्यांनी सहभाग घेतला.
- सायंकाळी हजारो संख्येने उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडला. यावेळी हभप मंगल महाराज जगताप, हभप हांडे महाराज यांनी वधू वारांना शुभाशीर्वाद दिले तर खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सोहळ्यातील अन्नदान केल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांचा श्री हनुमानाची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार