Dainik Maval News : लोणावळा शहरातील सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहरातील विविध समस्या मांडण्यात आल्या आहेत.
- पावसाळ्यापूर्वी गटारे व नाले सफाई, खड्डे बुजवणे, तसेच दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या जीबीएस रोगाचा धोका लक्षात घेता पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्त करणे, शिवस्मारकाचे काम बऱ्याच काळापासून बंद असून ते पुन्हा सुरु करण्याची मागणी आदी मागण्याचा यात समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते, गटारलाइन आणि नवीन प्लॅन संदर्भात समिती स्थापन झाली होती. त्यांचे काम आता पूर्ण झाले असल्याने या कमिटीवर नाहक खर्च न करता उच्च न्यायालयात आपली बाजू मांडून कमिटी रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनीची व्यवस्था करावी, तसेच तिथे लागणारे गॅस सिलिंडर नगरपरिषदेकडून उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष निखिल कवीश्वर, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, संध्या खंडेलवाल, जंगबहादूर बक्षी, कमुभाई जसदनवाला, प्रफुल्ल राजपूत, मंगेश बालगुडे, सूर्यकांत औरंगे, फिरोज बागवान, अब्बास खान आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne