मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा काँग्रेस (आय) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ( maval bajar samiti )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील आठवड्यात (दिनांक 24 मे) मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे संभाजी शिंदे आणि उपसभापती पदी नामदेव शेलार यांची बिनविरोध निवड झाली. मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, गणेश खांडगे यांच्या नेतृत्वात मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. ( congress leader balasaheb thorat felicitated maval agricultural produce market committee chairman and deputy chairman )
महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी कृषी मंत्री तथा संगमनेरचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संभाजी शिंदे आणि नामदेव शेलार यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे, संभाजीराव राक्षे, संचालक दिलीप ढोरे, मारूती वाळूंज, अमोल मोकाशी, नथू वाघमारे, विक्रम बोडके आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News
– अजित करवंदे आणि सावरी सातकर ठरले मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे मानकरी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी