महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. मात्र शेवटच्या काही दिवसांसाठी काही असेना, राज्य विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. काँग्रेस (आय) पक्षाच्या दिल्ली हायकमांडने विजय वडेट्टीवार यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवली आहे. असे असले तरीही काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी मात्र बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे. ( Congress Party Appointed Vijay Wadettiwar As Leader of Opposition In Maharashtra Legislative Assembly )
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षाने हा अंतिम निर्णय घेतला आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं? हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अनेक दिवसांपासून अडकला होता. अखेर दिल्लीतून वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं. सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकाला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीत पाठवल्याची चर्चा होती. परंतू आमदारांच्या समर्थनापलीकडे विचार करुन दिल्ली हायकमांडने विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
ह्या निर्णयासह राज्यात आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातले आहेतच, त्यांसोबत विरोधी पक्षनेते देखील विदर्भातील असणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत आणि विजय वडेट्टीवार हे सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पद एकाच समाजातून आणि प्रदेशातून देत काँग्रेस पक्षाने प्रादेशिक आणि सामाजिक समिकरणही डोळ्यांसमोर ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. ( Congress Party Appointed Vijay Wadettiwar As Leader of Opposition In Maharashtra Legislative Assembly )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘समृद्धी’चे आणखीन बळी! गर्डर आणि क्रेन कोसळल्याने 17 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
– ‘महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे सौभाग्य’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
– मावळात 80 टक्के भात लागवडी पूर्ण; पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांचीही लवकरच ‘वाढऔंज’