Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून परंदवडी येथील दलितवस्तीमध्ये ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचे काम पूर्ण झाले आहे. या उपयुक्त सामाजिक प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांना सामूहिक उपक्रमांसाठी व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एक छताखाली जागा उपलब्ध झाली आहे.
या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या आमदार स्थानिक विकास निधी २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष ४५१५ अंतर्गत सुमारे २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. ठेकेदार ओंकार टेकवडे यांच्या मार्फत हे काम सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), पुणे येथील कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली संपूर्ण काम मार्गी लावण्यात आले.
- समाजमंदिराचे हे बांधकाम स्थानिक दलित वस्तीतील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू ठरणार आहे. पूर्वी अशा सोयींचा अभाव असल्यामुळे लग्नसमारंभ, श्राद्ध विधी, बैठका यांसाठी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या नव्या सुविधेमुळे गावकऱ्यांना हक्काची व समर्पक जागा मिळाली आहे.
या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांचे विशेष आभार मानले असून, त्यांनी वेळोवेळी दिलेला पाठपुरावा आणि निधी मिळवून दिल्यामुळेच समाजमंदिराचे स्वप्न साकार झाले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime