जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 29 जून) रात्री उशीरा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुणे दिशेने जात असलेला कंटेनर डिव्हायडर पलटून मुंबई लेनवर गेला, तिथे त्याने दोन कारला धडक दिली. या भीषण अपघातामुळे वाहतूक काहीकाळ थबकली होती. पाऊस आणि अंधार यामुळे अपघाताची दाहकता अधिक वाटत होती, परंतु सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीच्या आधारे, कंटेनरच्या धडकेनंतर कार दुरवर फेकल्या गेल्या. यात ड्रायव्हर कारमध्ये अडकून पडल्याने त्याला काढण्यासाठी आपदा मित्र आले. पोलिस, आपदा मित्र आणि स्थानिकांच्या मदतीने कारमधील चालकाची सुटका करण्यात आली. या अपघातात अनेकजण किरकोळ जखमी झालेत. जखमींची नावे समजू शकली नाहीत. परंतु अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ( Container car accident near Shilatne village on old Mumbai Pune highway )
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहनचालकांचा बेदकारपणे वाहने चालवण्याचा प्रकार हा कधी कधी सामान्यांच्या जीवावर उठतो, महिन्याभरातील हे तीसरे चौथे उदाहरण आहे.
अधिक वाचा –
– देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– वडगावातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । Vadgaon Maval
– राज्याचा अर्थसंकल्प वाचा सोप्या भाषेत, महिलांसाठी कोणत्या योजना, युवकांना काय मिळालं? राज्यावर किती कर्ज? पाहा एका क्लिकवर