मावळ तालुका वारकरी मंडळाकडून वृक्षारोपण – मावळ तालुका वारकरी मंडळ यांच्या वतीने पवनानगर पोलिस चौकी इथे, तसेच महागाव प्रभाचीवाडी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष भरत महाराज वरगडे गुरुजी, उपाध्यक्ष भाऊसाहेब आंभोरे, महिला अध्यक्ष सारिका निकम, उपाध्यक्ष दिपाली ओझरकर, कोषाध्यक्ष बाबासाहेब गाडे, सचिव बळीराम ढोले, सहसचिव गोपाळ महाराज तुपे व संपर्कप्रमुख शिवाजी महाराज ढोले इ. उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. ( Plantation by Maval Taluka Warkari Mandal )
परांजपे शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 1993-94 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा संचाची भेट दिली. शालेय समिती सदस्य आनंद भेगडे, प्रा. वसंत पवार, तुषार भेगडे, श्रीकांत दाभाडे यांच्यासह माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. ( Gift of CCTV camera set to Adv PV Paranjape School )
कुरवंडे ग्रामपंचायतीचा ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत कार्यक्रम – कुरवंडे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ‘मेरी मिट्टी, मेरा अभिमान’ अंतर्गत नौदल अधिकाऱ्यांच्या हस्ते मायभुमीची माती घेऊन कलशाचे पूजन करण्यात आले. नौदलाच्या आयएनएस शिवाजीचे कमांडर बलदेवसिंग भट्टी, लें. कमांडर जे. एम. गिल, कमांडर सुनील शिंदे, प्रमोद भांदिरगे, सरपंच अनिता कडू, उपसरपंच साधना यादव, रोहित गायकवाड, सचिन कडू, सुप्रिया पडवळ, राजश्री कडू, चदाराणी राऊत, कविता ससाणे, रोहिणी केदारी, अविनाश जांभूळकर, नीलेश पणीकर, ग्रामसेवक उज्वला डावरे, पोलिस पाटील प्रीतम ससाणे उपस्थित होते. ( Program of Kurwande Gram Panchayat under Meri Mati Mera Desh )
जायंट्स ग्रुपकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप – जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने पिंपळखुटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 41 विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील साखरे यांच्या हस्ते अंगणवाडी शाळेत ध्वजवंदन करण्यात आले. संदीप गोंदेगावे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. ॲड देविदास टिळे यांनी संस्थेची माहिती देत ग्रामस्थांचे आणि जिल्हा परिषद शाळा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. ( Distribution of educational materials through Giants Group of Talegaon Dabhade )
लोणावळ्यातील भांगरवाडीमध्ये रक्तदान शिबिर – संत ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात 55 बाटल्या रक्त संकलन झाले. श्री म्हसोबा उत्सव मंडळ, श्रीमंत वाद्यपथक, लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने व नंदकुमार वाळंज यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले होते. क्लबचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, मीनाक्षी गायकवाड, रामदास दरेकर, राजेश मेहता, उमा मेहता, अमित आगरवाल, कीर्ती आगरवाल, हेमंत आगरवाल, हेमंत पाटेकर, प्रकल्प प्रमुख व माजी नगरसेवक मनोज लऊळकर आदी उपस्थित होते. ( Blood donation camp at Bhangarwadi in Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– …अन् दारुंब्रे शाळेच्या भिंती लागल्या बोलू, आमदार सुनिल शेळकेंकडून तोंडभरुन कौतूक
– स्वातंत्र्यदिनी नवजीवन! राज्यातील विविध कारागृहांमधून तब्बल 186 कैद्यांची सुटका, जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न, आयुक्त सौरभ राव यांनी दिले महत्वाचे निर्देश