Dainik Maval News : दारूंब्रे गावचे विद्यमान सरपंच मयूर संजय वाघोले यांची सरपंच सेवा महासंघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विकास शिवाजीराव कडू पाटील यांनी वाघोले यांना नियुक्तीचे पत्र दिले.
- दारूंब्रे सारख्या गावात विकासाची विविध कामे करीत असताना, सामान्यांचे प्रश्न मार्गी लावीत असताना सरपंच म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावित असल्याचे पाहून संघटनेच्या कोअर कमिटीने मयूर वाघोले यांच्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे काम जबाबदारीने करून सरपंच बांधवांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुणे जिल्हा सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष सागर चोरघे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले, माजी सरपंच सोमनाथ वाघोले, माजी उपसरपंच गणेश वाघोले, राकेश सोरटे, मच्छिंद्र वाघोले, भोर तालुका सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष, पारवडी गावचे सरपंच अमोल लिमण यांच्या उपस्थितीत मयुर वाघोले यांचा सन्मान करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार