मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘भव्य जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली होती. खारघर येथील श्री रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडली. सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या विजयाचा निर्धार बोलून दाखवला. तसेच यावेळी फडणवीस यांनी श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना त्यांना मिळणाऱ्या मतांबद्दलही विधान केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय म्हणाले फडणवीस ?
‘श्रीरंग बारणे यांना सर्वात जास्त लीड पनवेल विधानसभामधून मिळणार आहे. ही देशाची निवडणूक आहे, महानगरपालिकेची नाही. त्यामुळे विकासपुरूष असलेल्या मोदींना निवडून द्या. महायुतीला विजयी करा. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 28 पक्षांची खिचडी तयार झाली आहे. महायुतीची गाडी ही विकासाचे मेट्रो आहे. याचे इंजिन मोदी आहेत. सर्व जातीच्या लोकांना गाडीत बसवून विकासाकडे जात आहेत. दुसरीकडे रेल्वे गाडीला फक्त इंजिन आहेत, डबे नाहीत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जण गाडीचे इंजिन बनत आहे. त्यामुळे जो तो आपल्याला हवे त्या दिशेने इंजिन घेवून जाणार आहे.’ ( DCM Devendra Fadnavis’s rally to campaign for Maval Lok Sabha candidate Shrirang Barane )
विरोधकांवर जोरात टीका –
‘इंजिनमध्ये फक्त दोघांना बसायला जागा आहे. ठाकरे, पवार, गांधींनी स्वत:च्या परिवाराची सोय केली. मोदींनी 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. घरे दिली, गॅस दिला, मुद्रा लोन दिले. 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचे कर्ज मुद्रा लोनने दिले. यातील 31 कोटी महिला आहेत. बचत गटाचा मोठा सहभाग आहे. 10 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे काम मोदी करणार आहेत. महिलांना मुख्य धारेत आणले आहे. यापुढे 33 टक्के आमदार आणि खासदार महिला असतील. अनुसुचित जाती, अदिवासी समाज, 12 बलुतेदारांचा विचार केला. यासाठी 14 हजार कोटींची योजना आणली.’
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune News
– Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा… । विशेष लेख
– मे अखेरपर्यंत इंद्रायणी नदीवरील पूल बांधून पूर्ण न झाल्यास मोठे जनआंंदोलन करण्याचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर । Maval News