Dainik Maval News : किराणा साहित्य आणायला गेलेल्या दुचाकीस्वार तरुणाला कंटेनरने धडक दिली. यात डोक्यास मार लागून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. तळेगाव स्टेशन येथे वडगाव-तळेगाव रस्त्यावर हा अपघात झाला. निखिल ननावरे (वय 30, रा.मलठण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
चंद्रप्रकाश यादव (वय 28, रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय राऊत (वय 34 रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
- मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दत्तात्रय यांचा मेव्हणा निखिल ननावरे हे दोन दिवसांपूर्वी कामाच्या शोधानिमित्त तक्रारदार दत्तात्रय यांच्याकडे राहण्यास आले होते. दरम्यान, रविवारी (दि. 30) रात्री किराणा साहित्य घेण्यास निखिल घरातून बाहेर पडले. त्यावेळी वडगाव-तळेगाव रस्त्यावर चंद्रप्रकाश यादव याने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव चालवून निखील यांच्या दुचाकीला धडक दिली.
कंटेनरच्या धडकेने निखिल यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच निखिल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातानंतर कंटेनर चालक चंद्रप्रकाश यादव हा घटनास्थळी न थांबता पळून जात होता. त्याला पुढे जाऊन पकडण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade