शेतात मोबाईल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने गरीब शेतकऱ्याची 54 हजार 490 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. मोबाईल आणि ईमेलद्वारे दिनांक 2 ते 16 ऑक्टोबर 2023 कालावधीत हा फसवणुकीचा हा प्रकार घडला. याप्रकरणी लिंबाजी रामभाऊ गायकवाड (वय 56, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी शुक्रवारी (दि. 5 जाने.) शिरगाव – परंदवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी मोबाईल नंबर धारक, एचडीएफसी बँक खातेधारक, मेलआयडीधारक या अनोळखी संशयित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे शेतकरी आहेत आणि शिरगाव येथे शेती करतात. संशयितांनी फिर्यादी गायकवाड यांना मोबाईलवरून तसेच वेळोवेळी इमेल आयडीवरून मेल करून मोबाईल टॉवर बसवण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांच्या राहत्या पत्त्यावर पोस्टाने व्हीआय कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून 54 हजार 490 रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास शिरगाव पोलिसचे पोलिस नाईक परदेशी करीत आहेत. ( deception of farmer on pretext of installing mobile tower in field shirgaon police maval )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! भुगावजवळील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह, गाडी तरंगताना दिसल्यावर प्रकार उघडकीस, परिसरात खळबळ । Pune News
– पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही । Maval Lok Sabha
– विजय जाधव यांच्या उपस्थितीत मावळ तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक; संघटनात्मक बांधणीसाठी खास नियोजन