Dainik Maval News : महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात यावर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता दिनांक 1 ते 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या 15 दिवसांत महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून महसूल विभागाच्या विविध योजना आणि सेवा सुविधांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवड्याचे आयोजन –
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार यावर्षी राज्यात महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शुभारंभ मावळ तालुक्यातील भेगडे लॉन्स, वडगाव मावळ येथे सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
पुणे जिल्ह्यात 1 ते 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असून या कालावधीत महसूल विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच विभागाच्या विविध योजनांचा लाभ, दाखल्यांचे वितरण आणि सेवा सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या पंधरवड्यात उत्सर्फूतपणे सहभागी होऊन योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले आहे. ( Decision to celebrate revenue fortnight In Maharashtra Pune district fortnight at Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– BREAKING : लोहगड – धालेवाडी जवळील डोंगराला भेगा, भूस्खलन होण्याची शक्यता, ग्रामस्थ भयभीत, प्रशासनाकडून पाहणी
– मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन, आमदार सुनिल शेळके यांची अध्यक्षपदी नियुक्ती
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’