व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोहगड – धालेवाडी जवळील डोंगराला भेगा, भूस्खलन होण्याची शक्यता, ग्रामस्थ भयभीत, प्रशासनाकडून पाहणी

मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्याने भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 14, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Cracks in the mountain near Lohgad Dhalewadi village in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्याने भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे लोहगड आणि धालेवाडी येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून डोंगराला भेगा असल्याने प्रशासनाकडून स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डोंगराला भेगा पडल्याते दिसताच गुराख्यांनी अगोदर ग्रामस्थांना सतर्क केले. त्यानंतर तहसीलदार, गावकामगार तलाठी आदी अधिकाऱ्यांनी तिथे प्रत्यक्ष पाहणी केली. गावावर दरड कोसळण्याची भीती मनात बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोहगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड आणि धालेवाडी गावाला या प्रकारामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. लोहगड गावामध्ये सुमारे 500 ते 600 लोकवस्ती असून धालेवाडी गावामध्ये 250 ते 300 लोकवस्ती आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे याठिकाणी डोंगराला भेगा पडल्याचे डोंगरावर जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती गावकरी आणि त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच प्रशासन ग्रामस्थांच्या सतत संपर्कात असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले आहे. ( Cracks in the mountain near Lohgad Dhalewadi village in Maval taluka possibility of landslide )

परिसरात यापूर्वी झाले आहे भूस्खलन –
लोहगड परिसरात याठिकाणी 1989 साली मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन लोहगड येथील तीन ते चार घरे त्यामध्ये गाडली गेली होती. तर अनेक जनावरे मृत झाली होती. तसेच सन 2006 साली याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन धालेवाडी येथील शेतकऱ्यांची भात शेती त्यात गाडून गेली होती. तसेच परिसरातील भाजे गावातही दरड कोसळण्याची घटना यापूर्वी घडलेली आहे.

तहसीलदार देशमुख यांची प्रतिक्रिया –
या घटनेबद्दल बोलताना तहसीलदार विक्रम देशमुख म्हणाले की, मागील आठवड्यात येथे जोरदार अतिवृष्ठी झाली होती. जोरदार पावसामुळे डोंगराचा जो भाग मऊ आहे, तिथे भेगा पडल्या आहेत. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तरी देखील भूगर्भशास्त्र विभागाकडे हे कशामुळे झाले आहे, ते समजण्यासाठी पाठवले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला खरे कारण समजेल, तोवर प्रशासन गावातील नागरिकांच्या संपर्कात आहे.

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन, आमदार सुनिल शेळके यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या ; मावळ तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Congress

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या ; मावळ तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.