व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’

दिनांक 16 मार्च 2024 हा दिवस मावळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्ता कधीही विसरणार नाही. लोकसभा निवडणूकांच्या काळातील हा दिवस मावळच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Taluka BJP Vidhan Sabha Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


दिनांक 16 मार्च 2024 हा दिवस मावळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्ता कधीही विसरणार नाही. लोकसभा निवडणूकांच्या काळातील हा दिवस मावळच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा होता. मावळ लोकसभा निवडणूकीत एनडीए घटकपक्षातील भाजपा पक्षाचाच उमेदवार असावा आणि मावळ तालुक्याला संधी द्यावी आणि ही संधी बाळाभाऊंच्या रुपाने मिळावी यासाठी मावळ तालुक्यातील तमाम भाजपा कार्यकर्ते माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या घरी गोळा झाले होते. अनेकांची भाषणे झाली, तीव्र विरोधाच्या भुमिका मांडल्या गेल्या तर काही कार्यकर्त्यांनी विद्यमानांच्या विरोधात थेट ‘नोटा’ची भाषा केली. एकंदरीत दिवस प्रचंड गाजला. पण त्यानंतर काय झाले, हे संपूर्ण तालुक्यानेच नव्हे तर राज्याने पाहिले. टोकाचा विरोध केल्यानंतरही पक्षाचा आदेश, युतीचा धर्म अशी कारणे देत भाजपा नेत्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला दिलसे गुंतवून घेतले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

त्यानंतर आता संपूर्ण राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. मावळ विधानसभा हा तसा भाजपाचा बालेकिल्ला. तब्बल 25 वर्षे मावळ विधानसभेत फक्त भाजपाचे कमळ फुलत होते. हे कमळ खोडून काढण्याची किमया 2019 साली केली ती पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते आणि निवडणूकीवेळी राष्ट्रवादीमय झालेले सुनिल शेळके यांनी. राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा जवळपास 90 हजारहून अधिकच्या मतांनी पराभव करत पहिल्यांदाच मावळात घड्याळाची टिकटिक आमदार शेळकेंनी वाजवली. परंतु बाळा भेगडे यांचा पराभव भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड जिव्हारी लागला. त्यानंतरच्या काळात पक्षाला तालुक्यात रवींद्र भेगडे यांनी सावरून धरले आणि पाच वर्षे बाळा भेगडे, रवींद्र भेगडे आणि टीमने भाजपाचा दबदबा कायम ठेवला. याच जोषात लोकसभेला तिकीट मागण्याची हिंमत भाजपा कार्यकर्त्यांनी ठेवली होती. परंतू त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला, काही प्रमाणात कार्यकर्ते आपल्या नेत्यांवरही नाराज झाले. पण लोकसभेची कसर विधानसभेत भरून काढू या इर्षेने भाजपा कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले.

मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कन्फ्युज करणारी भुमिका तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. लोकसभेप्रमाणेच तिकिट वाटपापूर्वी भाजपा पुन्हा एकदा जोषात विधानसभेसाठी स्वतःचे स्थान बळकट करत आहे, आणि निवडणूक लढवण्याची भाषा करत आहे. विद्यमानांना टोकाचा विरोध करत आहे. यासाठीच दोन दिवसांपूर्वी वडगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यात बाळा भेगडे, रवींद्र भेगडे, भाऊसाहेब गुंड आणि इतर सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते. या पत्रकार परिषदेत ही विधानसभा लढवायचीच, कमळाच्या चिन्हावरच लढवायची, आर या पारची भाषा, विजयी संकल्प सभेची घोषणा हे सर्वकाही नेत्यांनी केले. पण… आणि पुन्हा कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारा पण इथे आडवा आलाय.

एकीकडे बाळा भेगडे यांनी विधानसभेसाठी विजयी संकल्प सभेची घोषणा केली असता, दुसरीकडे वेळ आल्यावर पक्षाचा आदेश पाळणार. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वरिष्ठांचा आदेश पाळणार, युतीचा धर्म पाळणार या सर्व गोष्टींची जाहीर कबुली पत्रकार परिषदेत दिलीये. याचा अर्थ आता नेमका काय घ्यावा, याच कन्फ्युजनमध्ये सध्या भाजपा कार्यकर्ता आहे. दुसरीकडे रवींद्र भेगडे यांनी मात्र त्याच पत्रकार परिषदेत मावळात कमळाचाच उमेदवार असणार आणि भाजपा ही विधानसभा लढवणार हे जोषात जाहीर केले. तसेच त्यांनी स्वतःही विधानसभेसाठी कंबर कसली आहे. परंतू ही अशी कंबर बाळा भेगडे यांनी लोकसभेलाही कसली होती, त्यांचेही फ्लेक्स लागले होते. त्यामुळे आज जी नेत्यांची भुमिका आहे, ती नंतरही भुमिका तशीच असेल का, याबद्दल कार्यकर्ते जरा साशंक आहे. मात्र येत्या 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विजयी संकल्प सभेला सर्व चित्र स्पष्ट होईल, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. ( Maval Taluka BJP Vidhan Sabha Election Preparation Bala Bhegade Ravindra Bhegade )

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News
– वराळे येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न, तळेगावमधील अडीचशे मुलांचा सहभाग, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बेल्ट प्रदान


Previous Post

शिवसेना ठाकरे गटाकडून पवनामाईचे जलपूजन संपन्न, पवना धरण 86 टक्के भरलेले असतानाच जलपूजन केल्याने चर्चांना उधाण । Pavana Dam

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मावळ तालुक्यातून 43 हजार अर्ज, अर्जांची छाननी सुरू । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मावळ तालुक्यातून 43 हजार अर्ज, अर्जांची छाननी सुरू । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.