महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक विभागाने 18 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या वडगाव व कातवी हद्दीतील सुमारे 94 हेक्टर म्हणजे सुमारे 250 एकर क्षेत्र विनाअधिसुचीत करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे संबंधित जमिनी या औद्योगिक विभागाच्या संपादनातून मुक्त झाल्या असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वडगाव शहर व कातवी या दोन्ही गावांच्या मध्यावर, रेल्वे लाईनलगत असणारे 94 हेक्टर क्षेत्र हे औद्योगिक विभागाने सन 2006 मध्ये संपादित करण्याचा निर्णय घेतला आणि सन 2008 मध्ये प्रत्यक्ष कार्यवाही होऊन संबंधित क्षेत्र हे संपादित झाले होते. तेव्हापासून आजतागायत संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही लाभ घेता येत नव्हता. ( decision to free acquisition of 250 acres of industrial land in vadgaon maval and katavi areas )
आमदार शेळके यांचा यशस्वी पाठपुरावा –
संबंधित क्षेत्र संपादित झाले तेव्हापासूनच शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे जागा संपादित होऊनही त्याठिकाणी पुढील कार्यवाही होऊ शकली नाही.दरम्यान, संबंधित क्षेत्र संपादनातून मुक्त करावे यासाठी आमदार सुनिल शेळके यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, 20 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित क्षेत्र विना अधिसूचित करण्याबाबत अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. अखेर त्यास शासनाचे सह सचिव संजय देगावकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता संबंधित क्षेत्र हे संपादनातून मुक्त झाले असून लवकरच सातबारा उतारावरील संपादनाचे शेरेही काढले जातील. मागील अठरा वर्षांपासून नागरिकांकडून होत असलेल्या मागणीला यश मिळणार असुन यामुळे या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
“वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या वडगाव व कातवी हद्दीतील सुमारे 250 एकर संपादित क्षेत्र हे औद्योगिक विभागातुन मुक्त झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकीकरण वाढत असल्याने या जमिनींना अनन्यसाधारण महत्व आहे. कृपा करुन शेतकऱ्यांनी जमीन न विकता ती विकसित करावी किंवा व्यवसाय करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे.” – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला सरकारची मान्यता, अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश
– ‘सलोनी मोतीबने’ ठरल्या सौ-भाग्यवती मावळ 2024; कामशेत येथे 40 हजार महिलांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम
– राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात लोकसभा उमेदवाराला 95 लाख इतकी खर्चाची मर्यादा