गांजा या अंमली पदार्थाची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांना देहूरोड पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जीवनरेखा हॉस्पिटल, देहूरोड समोर अंतर्गत रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी पोलिस शिपाई स्वप्निल चंद्रकांत साबळे (वय ३२ वर्षे, पोलिस शिपाई देहूरोड पोलीस स्टेशन, पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार देहुरोड पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब), आय आय (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( dehu road police arrested two person red handed who selling ganja illegally )
१) विकास मालसिंग सेनानी (वय १८ वर्षे) आणि २) अनिल शोभाराम सेनानी (वय २३ वर्षे) दोघेही सध्या राहणार विठ्ठलवाडी, देहूगाव (ता.हवेली जि. पुणे) मुळ राहणार दोंदवाडा, पोस्ट जोगवाडा, ता.नेवाली, जि. बडवानी (मध्य प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख आणि ठिकाणी दोन्ही आरोपींजवळ बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी ५ किलो वजनाचा एकूण १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगून विक्री करत असताना मिळून आले. या दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास सपोनि गज्जेवार हे करत आहेत. ( dehu road police arrested two person red handed who selling ganja illegally )
अधिक वाचा –
– पोहण्याचा मोह जीवावर बेतला! कामशेतजवळ इंद्रायणी नदीत बुडून दापोडीतील तरुणाचा मृत्यू
– तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनसमोर ऑटो रिक्षा आणि कंटेनरचा अपघात; शहर भागात एकाच दिवशी तिसरा अपघात