महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश आले आहे. दिनांक 14 मे रोजी देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध सुरू होता. अखेर अत्यंत शिताफीने पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हा 272/2024 कलम 354 भा.द.वि अन्वये गुन्ह्यातील फिर्यादी महिला यांनी दिनांक 14 मे 2024 रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादी या कोरेगाव पार्क येथे आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरीता कॅब (क्र. एम.एच. १४ एल.बी. ४१३३) याने जात असताना कॅब चालक राहुल पांडुरंग म्हस्के (रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) याने सदरची कॅब कोरेगाव पार्क दिशेने न नेता उलट दिशेने देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणली. तिथे त्याने महिलेच्या एकटेपणाचा फायदा उचलून वाहनामध्ये विनयभंग केला. त्यानुसार त्यावर देहुरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Dehu Road Police succeeded in arresting Ola cab driver who absconded after molesting woman )
गुन्हा दाखल झाल्यापासून कॅब चालक आरोपी राहुल पांडुरंग म्हस्के (रा. थेरगाव, पिंपरी- चिंचवड) हा आपले अस्तित्व लपवून पुणे शहरातंर्गत वावरत होता. त्याचा कोणताही प्रकारचा संपूर्ण पत्ता व माहिती नसताना देहुरोड पोलीस स्टेशनचे तपास पथकाच्या अधिकारी, अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन सदर आरोपीचा पत्ता शोधुन काढून त्यास शिताफीनी पकडून दाखल गुन्ह्यामध्ये अटक केली. तसेच गुन्ह्यामधील वापरती कॅब (क्र. एम.एच. १४ एल.बी. ४१३३) ही सुध्दा अटक आरोपीकडून जप्त केली आहे. अधिकचा तपास देहुरोड पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोउपनि पी.टी खनसे, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana
– मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट
– तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation