व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha

मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना खासदारकीची हॅट्रीक करायची आहे. परंतू तिसऱ्यांदा खासदार होण्याची बारणेंची ही इच्छा पूर्ण होणे कठीण दिसतंय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 24, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
maval-loksabha-bjp-vs-shivsena

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना खासदारकीची हॅट्रीक करायची आहे. परंतू तिसऱ्यांदा खासदार होण्याची बारणेंची ही इच्छा पूर्ण होणे कठीण दिसतंय. कारण प्रत्यक्ष निवडणूकीच्या रिंगणाआधीच उमेदवारी मिळवण्यासाठी बारणेंना महायुतीतील मित्र पक्षांचे रिंगण पार करावे लागणार आहे. आधी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रकटपणे केलेला विरोध, त्यानंतर भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली तिकीटाची मागणी, यामुळे आधीच मावळच्या जागेबद्दल युतीत तिढा निर्माण झालाय. अशात आता भाजपाच्या चिंचवड विधानसभेतील पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी पक्ष नेतृत्वाकडे नवी मागणी केलीये. मावळ लोकसभेसाठी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते – पदाधिकारी यांनी केलीये. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

‘महायुतीत मावळची जागा भाजपला मिळावी. शहराध्यक्ष जगताप यांना उमेदवारी द्यावी. शहराध्यक्ष म्हणून जगताप करत असलेले कार्य याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल. शिवाय महायुती तसेच भाजपाला विशेष फायदा होईल,’ अशा मागणीचे निवेदन भाजप शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. सन 2014 च्या निवडणुकीत शंकर जगताप यांचे बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून निवडणूक लढविली होती. त्याचाही फायदा पक्षाला तसेच महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी काळभोर यांनी केली आहे. ( demand for nomination of bjp shankar jagtap in maval lok sabha constituency shiv sena mp shrirang barane in trouble )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या या मावळ लोकसभा मतदारसंघावर आता भाजपाने दोन बाजूंनी प्रबळ दावा केला आहे. आधी भाजपाचे मावळचे माजी आमदार माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. बारणे यांच्यासाठी तर हा मोठा धक्काच आहे. त्यामुळे यातून नेमका कसा मार्ग काढला जातो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

अधिक वाचा –
– महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News
– ‘पीडित मुलीला न्याय मिळाला, आता त्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार’, कोथूर्णे निर्भया प्रकरणावर आमदार सुनिल शेळकेंची प्रतिक्रिया
– शिरगाव येथील ‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणकडून 4 लाखांची नुकसानभरपाई, आमदार शेळकेंनी आमसभेत दिले होते आदेश


Previous Post

अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, ‘…तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ । Maval Lok Sabha

Next Post

मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Journalist-Dnyaneshwar-Waghmare-Maval

मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना 'कर्तव्य दक्ष पुरस्कार' जाहीर । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.