व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पीडित मुलीला न्याय मिळाला, आता त्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार’, कोथूर्णे निर्भया प्रकरणावर आमदार सुनिल शेळकेंची प्रतिक्रिया

कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील कोथूर्णे गावात दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी घडलेल्या निर्भया प्रकरणाचा निकाल काल (शुक्रवार, दि. 22 मार्च) रोजी लागला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 23, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Koturne-Nirbhaya-case-mla-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील कोथूर्णे गावात दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी घडलेल्या निर्भया प्रकरणाचा निकाल काल (शुक्रवार, दि. 22 मार्च) रोजी लागला. सदर घटनेत 6 वर्षीय चिमुकलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून केला गेला होता. या प्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मावळ तालुका तसेच परिसरातील जनमानसात अत्यंत तीव्र आणि संतापजन्य प्रतिक्रिया उलटून अनेक आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. अखेर दीड वर्षांनी कोथूर्णेच्या निर्भयाला न्याय मिळाला. मावळ तालुक्यातील जनतेने यावर समाधान व्यक्त केले आहे. तर आमदार सुनिल शेळके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार – आमदार शेळके
कोथुर्णे येथील चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली आणि पीडित मुलीला न्याय मिळाला, याचे सर्व मावळवासीयांना मनापासून समाधान आहे. आरोपीने वरिष्ठ न्यायालयाकडे अपील केले तरी शिक्षा कायम राहावी, यासाठी आपण पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहू, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. ( Koturne Nirbhaya case Accused sentenced to death Reaction of MLA Sunil Shelke )

कामशेत पोलिसांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पूर्ण केला तपास –
कामशेत पोलिस ठाण्यात वरील नमूद गुन्ह्याचा तपास पोलिसांनी अत्यंत कुशलतेने आणि जलदगतीने करून आरोपीना ताब्यात घेतले होते, व त्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून नमूद गुन्ह्याची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू करावी, याकरिता शासनाला पत्र व्यवहार केला होता. त्याप्रमाणे शासनाने नमूद गुन्ह्याची द्रुतगती न्यायालयात सुनावणी सुरू करून शुक्रवार (दि. 22) रोजी नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अपहरण, खून, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या अधिनियमाखाली मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच सह आरोपी अर्थात प्रमुख आरोपीच्या आईला पुरावा नष्ट करणे या कलमाखाली सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ह्या गुन्ह्याची सुनावणी बी. पी. क्षीरसागर विशेष न्यायाधीश सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे यांच्या कोर्टात झाली.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल आणि 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
– पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा
– लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

शिरगाव येथील ‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणकडून 4 लाखांची नुकसानभरपाई, आमदार शेळकेंनी आमसभेत दिले होते आदेश

Next Post

महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dr-Vijay-Bhatkar

महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.