व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा

मावळ तालुक्यातील कोथूर्णे गावातील अल्पवयीन चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैं'गिक अत्या'चार करत खून केल्याची गंभीर घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 22, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा
Jail-And-Court

File Image


संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर सेशन कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कोथूर्णे निर्भया प्रकरणी आज, शुक्रवार (दि. 22 मार्च) रोजी अंतिम सुनावणी होती. दीड वर्षांपासून ही केस फास्टट्रॅक कोर्टात सुरू होती. सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर आणि सर्व बाजू ऐकूण घेतल्यानंतर कोर्टाने आज आपला अंतिम निकाल सांगितला. कोर्टाने मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर गुन्ह्यात आरोपीला सहाय्य करणाऱ्या त्याच्या आईलाही 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

कोथूर्णे निर्भया प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम –
मावळ तालुक्यातील कोथूर्णे गावातील अल्पवयीन चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैं’गिक अत्या’चार करत खून केल्याची गंभीर घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. तर मावळ तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला आणि आरोपीच्या आईला ताब्यात घेतले होते. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, आणि चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण मावळ तालुक्यात गावोगावी, शहरात मोर्चे आंदोलन करण्यात आले होते. राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली होती. अजित पवार यांसह अनेक पक्षाचे नेते, पदाधिकारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन गेले होते. अखेर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात आला.

दीड वर्ष फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून शुक्रवारी याचा अंतिम निकाल कोर्टाकडून जाहीर करण्यात आला. ज्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर त्याच्या आईला 7 वर्षाचा तुरुंगवास सुनावण्यात आला. या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि कागदपत्रे तयार करणारे पोलीस हवालदार अजय दरेकर, रवी राय, आशिष झगडे, गणेश तावरे, टिकू दीक्षित आणि संपूर्ण टीम व मार्गदर्शन करणारे वरिष्ठ यांनी याप्रकरणी पीडित कुटुंब आणि निर्भयाला न्याय मिळावा यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. ( Shivajinagar Court Big Verdict In Kothurne Nirbhaya Case Accused Sentenced To Death Maval Taluka Pune District )

अधिक वाचा –
– काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर! महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश, कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी
– दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ । CM Arvind Kejriwal Arrested By ED
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणाची शुक्रवारी अंतिम सुनावणी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News

Next Post

महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल आणि 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MPSC

महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल आणि 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.