व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा

लोकसभा निवडणूकांची घोषणा होऊन चार दिवस उलटले आहेत. अशात राज्यात मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 19, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Devendra-Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकांची घोषणा होऊन चार दिवस उलटले आहेत. अशात राज्यात मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये. महायुतीतील सत्तेत असणार भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही प्रमुख पक्षात जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरुच आहे. परंतू त्यासोबतच महायुतीचे आणि एनडीएचे घटकपक्ष असलेले अन्य पक्षही जागांची मागणी करत आहेत, त्यामुळे लोकसभा जागावाटपाचा महायुतीतील तिढा सुटण्याऐवजी वाढताना दिसत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महायुतीतील घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षानेही आता जागा वाटपाच्या रणात उडी घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आरपीआय आक्रमक झालेला दिसत आहे. शिर्डी मतदारसंघ स्वतःसाठी तर लोकसभा मतदारसंघ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी महायुतीने सोडावा, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाकडे केल्याची माहिती समोर येत आहे. परंतू भाजपाने याबाबत कडक भुमिका स्विकारून ह्या जागा न मिळतील, अशी भुमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. ( Demand To Give Shirdi Lok Sabha Constituency to RPI Party Ramdas Athawale BJP Devendra Fadnavis )

वर्ष 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांना पराभावाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भाजपा शिर्डी लोकसभेची ही जागा आरपीआयला देऊन पराभावाचा धोका पत्करणार नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ सोडला नाही तर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू, असा इशारा पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी दिला आहे.

अधिक वाचा –
– वडगाव शहरात IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा छापा, अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 जणांविरोधात गुन्हा । Maval Crime
– मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway
– वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval


Previous Post

शेतकऱ्याकडून 25 हजारांची लाच स्विकारताना तलाठ्याला रंगेहात अटक, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना

Next Post

लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांचा रुटमार्च । Vadgaon Maval Police Route March

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Police-Route-March

लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांचा रुटमार्च । Vadgaon Maval Police Route March

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.