Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात सोमवारी (दि. 21) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागरिकांच्या मेळाव्यात अनेक शासकीय तसेच स्थानिक नागरी समस्यांचे जागेवरच निराकरण केल्याने सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
संजय गांधी निराधार योजना मंजुरीचे दाखले, प्रधानमंत्री आवास योजना व जनधन योजना अंतर्गत 35 गावाचे 900 प्रस्ताव आले असून त्यामध्ये 19 गावांचे प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले. तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्न दाखले, जेष्ठ नागरिक ओळख पत्र आदीचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
- यावेळी व्यासपीठावर तहसीलदार देशमुख, प्रभारी उपमुख्याधिकारी कल्याणी लाडे, पोलीस उपनिरीक्षक भारत वारे, उपअभियंता डी. एच. दराडे, अशोक काळे, एस.आर वाळूंज, मंडळ अधिकारी एल. व्ही. सलगर, जलसंधारण अधिकारी दीपक ढवळे, तळेगाव तलाठी के. व्ही. मोहमारे, पुणे जिल्हा अध्यक्ष ग्राहक पंचायत नयना आभाळे, तळेगाव शहर निरंजन जहांगीरदार, भ्रष्टाचार निर्मलुन समिती अरुण माने, जयंत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण माने, जयंत कदम, नयना आभाळे, निरंजन जहांगीरदार यांनी तळेगाव परिसरात चांगल्या रस्त्याची खोदाई, भूमी अभिलेख कार्यालयाबाबत तक्रारी, अनधिकृत टोलनाका तसेच नगरपरिषदेच्या व्यावसायिक इमारतीमध्ये व्यवसायिकांकडून नगरपालिका भाडे घेत असताना मालमत्ता कर का घेते? आदी तक्रारी मांडल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार