बुधवारी (दि. 17 जुलै) रोजी झालेल्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्त तीर्थक्षेत्र देहूगाव येथील मुख्य मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्य मंदिरातील श्रीविठ्ठल मंदिर, शिळा मंदिर येथे एकादशीला पहाटेपासूनच भाविकांची रिघ लागली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देहू मंदिर परिसर फुलून गेला होता. या गर्दीमुळे देहूगावला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आषाढी एकादशी निमित्त देहूहून श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूराकडे जाते. तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पंढरीला असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला आले होते. पंरतू पालखी सोहळ्यात भाग न घेऊ शकलेले आणि पंढरपूरला जाऊ न शकलेले हजारो वारकरी भाविक देवशयनी आषाढी एकादशी निमित्त देहू येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. ( Devotees flock to Dehu on the occasion of Ashadhi Ekadashi )
देवशयनी आषाढी एकादशी आणि चातुर्मास –
एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मात महत्वाृचे स्थान आहे. वर्षात 24 एकादशी असतात. जेव्हा अधिक मास येतो तेव्हा त्यांची संख्या 26 पर्यंत वाढते. आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. काही ठिकाणी या तिथीला ‘पद्मनाभ’ असेही म्हणतात. सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा ही एकादशी येते. चातुर्मास हा या दिवसाचा प्रारंभ मानला जातो. या दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात निद्रा घेतात आणि त्यानंतर सुमारे चार महिन्यांनी (सूर्य तूळ राशीत गेल्यावर) ते निद्रावस्थेतून बाहेर (जागे ) येतात. त्या दिवसाला देवोत्थानी एकादशी म्हणतात. या अंतराला चातुर्मास म्हणतात.
अधिक वाचा –
– भात उत्पादन वाढीसाठी कडधे गावात चारसूत्री पद्धतीवरील प्रकल्पाचे आयोजन ; लाभार्थी शेतकऱ्यांना निविष्टा वाटप
– ग्रामीण भागात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News
– महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान