मावळ तालुक्यात ( Maval News ) धूलिवंदन सणाला गालबोट लागले आहे. मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत आज (मंगळवार, 7 मार्च) दुपारच्या सुमारास बुडून एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जयदीप पुरुषोत्तम पाटील (मुळ राहणार मु. तारखेडा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो आंबी येथील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता. ( Dhulivandan Festival Young Student Drowned In Indrayani River Near Varale Village In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जयदीप आणि त्याचे सहा-सात मित्र धुलिवंदन खेळून झाल्यावर इंद्रायणी नदीत हातपाय धुण्यासाठी गेले होते. तेव्हा जयदीप पाटील पाय घसरुन नदीत पडला आणि खोल पाण्यात बुडला. त्याच्या मित्रानी याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या सदस्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तास बोटीच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर जयदीपचा मृतदेह शव हाताशी लागले.
पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी यासंह पोलिस अधिकारी आणि वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचे प्रदिप गायकवाड, अनिश गराडे, गणेश गायकवाड, शुभम काकडे, रुत्विक तरू, विशाल जवेरी, गणेश सुंदेकर, अविनाश कारले, माली मामा, सत्यम सावंत, विनय सावंत, सुरज शिंदे, अनिल आंद्रे, निलेश गराडे, गणेश निसळ, गणेश ढोरे, वैभव वाघ यावेळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होते.
अधिक वाचा –
– ‘आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं’; तब्बल 25 वर्षांनी शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन, संस्थानकडून खास सत्कार
– मावळात ढगांच्या गडगडाटासह अन् विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; काही ठिकाणी गारपीट, बळीराजा संकटात