व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट! रंगलेले हातपाय धुवायला इंद्रायणी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत आज (मंगळवार, 7 मार्च) दुपारच्या सुमारास बुडून एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 7, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Student-Drowned-Maval

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यात ( Maval News ) धूलिवंदन सणाला गालबोट लागले आहे. मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत आज (मंगळवार, 7 मार्च) दुपारच्या सुमारास बुडून एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जयदीप पुरुषोत्तम पाटील (मुळ राहणार मु. तारखेडा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो आंबी येथील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता. ( Dhulivandan Festival Young Student Drowned In Indrayani River Near Varale Village In Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जयदीप आणि त्याचे सहा-सात मित्र धुलिवंदन खेळून झाल्यावर इंद्रायणी नदीत हातपाय धुण्यासाठी गेले होते. तेव्हा जयदीप पाटील पाय घसरुन नदीत पडला आणि खोल पाण्यात बुडला. त्याच्या मित्रानी याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या सदस्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तास बोटीच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर जयदीपचा मृतदेह शव हाताशी लागले.

पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी यासंह पोलिस अधिकारी आणि वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचे प्रदिप गायकवाड, अनिश गराडे, गणेश गायकवाड, शुभम काकडे, रुत्विक तरू, विशाल जवेरी, गणेश सुंदेकर, अविनाश कारले, माली मामा, सत्यम सावंत, विनय सावंत, सुरज शिंदे, अनिल आंद्रे, निलेश गराडे, गणेश निसळ, गणेश ढोरे, वैभव वाघ यावेळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होते.

अधिक वाचा –

– ‘आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं’; तब्बल 25 वर्षांनी शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन, संस्थानकडून खास सत्कार
– मावळात ढगांच्या गडगडाटासह अन् विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; काही ठिकाणी गारपीट, बळीराजा संकटात


dainik maval jahirat

Previous Post

‘आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं’; तब्बल 25 वर्षांनी शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन, संस्थानकडून खास सत्कार

Next Post

मुस्लीम धर्मगुरुच्या पत्नीचा विनयभंग, देहूरोड येथील धक्कादायक घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

मुस्लीम धर्मगुरुच्या पत्नीचा विनयभंग, देहूरोड येथील धक्कादायक घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 5, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.