पुण्यातील ‘पीएमपीएल’ प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘पीएमपी’कडून तीन मार्गांत बदल करण्यात आला आहे. लांब पल्ल्याचे अप्पर डेपो ते निगडी, भेकराईनगर ते हिंजवडी, कात्रज ते वडगाव मावळ हे तीन बस मार्ग मुख्य स्थानकापर्यंत खंडित करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमल’ने घेतला आहे. वाहतुक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. परंतू यामुळे सर्वसामान्य नागरिक, प्रवाशी, नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाचे मोठे हाल होत आहेत. ह्या बससेवा पुर्ववत कराव्यात अशी मागणी केली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वरील तीन मार्गांतील बदलासह कात्रज ते निगडी मार्गावर सहा बस (शेड्युल) वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. बदल करण्यात आलेले बस मार्ग पुढीलप्रमाणे;
- बस मार्ग क्रमांक 12 : अप्पर डेपो ते निगडी बस मार्ग शिवाजीनगरपर्यंत खंडित केला आहे. या मार्गावरील खेपांत वाढ करून सरासरी 10 मिनिटाला बस उपलब्ध होणार आहे.
- बस मार्ग क्रमांक 208 : भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3 या मार्गावर 12 गाड्यांपैकी सहा बस (शेड्युल) खंडित करून भेकराईनगर ते मनपा भवनपर्यंत सेवा सुरू राहणार आहे. या मार्गावर 25 मिनिटाला बस सेवा सुरू राहील. बाकी सहा बस भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3 अशा नियमित धावतील.
- बस मार्ग क्रमांक 228 : कात्रज ते वडगाव मावळ हा बस मार्ग मुकाई चौकापर्यंत खंडित करून खेपांमध्ये वाढ करण्यात आली असून या मार्गावर सरासरी 30 मिनिटाला बस सुरू राहणार आहे.
- बस मार्ग क्रमांक 229 : मुकाई चौक ते वडगाव मावळ या मार्गावर तीन बसच्या सरासरी 30 मिनिटांनी फेऱ्या होतील.
शेड्युलमध्ये वाढ केलेले बस मार्ग
बस मार्ग क्रमांक 42 : कात्रज ते निगडी, भक्ती शक्ती या मार्गावर सहा शेड्युलची वाढ करून खेपांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या मार्गात आता 25 शेड्युलद्वारे सरासरी 10 मिनिटाला बस सेवा उपलब्ध असेल. ( Direct bus service from Vadgaon Maval to Katraj stopped by PMPL administration )
अधिक वाचा –
– मावळचे सुपुत्र अमोल पोफळे ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी
– गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– ‘मनसे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार’ – तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर; वडगावमधील बैठकीत एकमुखी निर्णय