व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदाची बातमी! तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड थेट एसटी बस सेवा, दिनांक 30 सप्टेंबरपासून होणार सुरु

मावळ तालुक्यातून आता रायगड जिल्ह्यातील स्वराज्य राजधानी असलेल्या किल्ले रायगड इथे जाण्यासाठी थेट एसटी बस सेवा सुरु होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 14, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
raigad-fort-st-bus

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मावळ तालुक्यातून आता रायगड जिल्ह्यातील स्वराज्य राजधानी असलेल्या किल्ले रायगड इथे जाण्यासाठी थेट एसटी बस सेवा सुरु होत आहे. गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगाव मावळ आणि तालुक्यातील सर्व शिवभक्त यांच्या प्रयत्नातून शनिवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 पासून ही बससेवा सुरु होत आहे. ( direct st bus service from talegaon dabhade city maval taluka to raigad fort )

मावळ तालूक्यातून किल्ले रायगड करिता थेट एसटी बस सेवा नसल्याने शिवभक्तांना परिवारासह किल्ले रायगडावर जाण्याकरिता अडचण येत होती. ह्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता तळेगाव दाभाडे एसटी आगारातुन दर शनिवार – रविवारी किल्ले रायगड करिता एसटी बस सेवा चालू होत आहे, अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ यांच्याकडून देण्यात आली.

वेळ : ही बस तळेगाव दाभाडे येथून सकाळी 6 वाजता किल्ले रायगडच्या दिशेने निघेल तर, किल्ले रायगड येथून परतीचा प्रवास संध्याकाळी 5 वाजता सुरु होईल.
बुकींग : बससाठी बुकिंग सुविधा ही ऑनलाईन देखील उपलब्ध असणार आहे.
बस थांबे : तळेगाव दाभाडे – लोणावळा – खोपोली – पाली – महाड – किल्ले रायगड ह्या ठिकाणांवर बस थांबेल, अशी माहिती तळेगाव दाभाडे बस डेपोचे आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी दैनिक मावळला दिली.

तळेगाव दाभाडे ते रायगड बस सेवेमुळे होणारे फायदे;

  1. लोणावळा करिता पर्यायी प्रवाशी वाहतूकीची सोय
  2. अष्टविनायक गणपतींपैकी आठवा गणपती श्री बल्लाळेश्वर दर्शन शक्य
  3. पाली जवळील सरसगड आणि सुधागड पैकी एक किल्ला एका दिवसात पाहणे शक्य
  4. उन्हेरे गरम पाण्याचे कुंड पाहता येणार
  5. मार्गावरील स्थानिक नागरिकांना ह्या बससेवेचा फायदा होणार

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सोमाटणेतील ‘त्या’ 3 मराठा युवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना निवदेन
– मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय
– पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्यामुळे मावळमधील सर्वपक्षीय कृती समितीचा मोठा निर्णय! लगेच वाचा…


Previous Post

दुःखद बातमी! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांच्या पत्नी आशालता सातकर यांचे निधन

Next Post

दारुंब्रे गावात आरोग्य शिबिर, 69 रुग्णांची मोफत तपासणी, अनेक तज्ज्ञांकडून उपयुक्त मार्गदर्शन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
health-camp

दारुंब्रे गावात आरोग्य शिबिर, 69 रुग्णांची मोफत तपासणी, अनेक तज्ज्ञांकडून उपयुक्त मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DCM Ajit Pawar pays emotional tribute to former Maval MLA Krishnarao Bhegde

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

July 1, 2025
Never-seen photos of Krishnarao Bhegde See only on Dainik Maval Krishnarao Bhegde Passes Away

“कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away

July 1, 2025
Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

June 30, 2025
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.