वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम ह्यांची आज (शनिवार, दिनांक 29 जुलै) वडगाव नगरपंचायतच्या मनसेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर आणि मनसे शहर पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी वडगाव मावळ शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने भेडसावणाऱ्या अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ( Discussion Between MNS Leaders and PI Kumar Kadam Regarding Vadgaon Maval City Security Issues )
खालील विषयांवर झाली चर्चा…
प्रामुख्याने वडगाव शहरातील अनिर्बंध पार्किंग व त्यावरील उपाययोजना, शहरातील दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी व उपाययोजना करण्यासाठी वडगांव नगरपंचायत, व्यापारी, पोलिस प्रशासन यांची एकत्रित चर्चा घडवून आणणे, वडगाव शहरात कायदा सुव्यस्था आबाधित राहावी तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा व त्यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील सर्व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी नगरपंचायतकडे आग्रह धरण्यात यावा, विविध विकासकामे करताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य करणे.
वरील विषयांवर सर्वांमध्ये चर्चा झाली. तसेच मनसे शिष्टमंडळाने यावेळी वडगाव शहरासाठी तब्बल एका वर्षानंतर नव्या महिला उपनिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ऋतुजा मोहिते यांची देखील भेट घेऊन स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील महिला व बालकांच्या दृष्टीने संरक्षणात्मक कारवाई व उपायोजना यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मावळ मनसेचे नेते तानाजी तोडकर, वडगाव शहर अध्यक्ष मच्छिंद्र मोहिते, महिला शहराध्यक्ष अर्चना ढोरे, पक्षनेते संतोष म्हाळसकर, दिनेश म्हाळसकर, विकास साबळे देखील उपस्थित होते. ( Discussion Between MNS Leaders and PI Kumar Kadam Regarding Vadgaon Maval City Security Issues )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– निला केसकर ह्यांचा कार्यपूर्ती गौरव सोहळा; सेवानिवृतीनंतर नवीन ध्येय प्राप्त करण्याचा शुभारंभ होतो – संतोष खांडगे
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News