मावळ तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळून येतात. त्यातही अजगर प्रजातीचे साप आढळून येण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. औंढोली या गावात तर अलीकडे अनेकदा अजगर जातीचे साप आढळून आलेत. परंतू शुक्रवारी मावळमधील बोरज गावात 4 – 5 नव्हे तब्बल 15 फुटी अजगर आढळून आला. खाऊन सुस्तावलेला हा अजगर पाहण्यांसाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. वन्यजीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र आणि वनविभाग यांनी या अजगराला तिथून रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडून दिले. ( 15 Foot Python Snake Rescue In Boraj Village of Maval Taluka )
मावळ तालुक्यातील बोरज गावात एका कुटुंबाच्या गाईच्या गोठ्यापासून बऱ्याच अंतरावर डोंगरामध्ये रस्त्याच्या बाजूला असेलल्या पाण्याच्या ओहोळात एक भलामोठा अजगर साप होता. ह्या अजगराने काहीतरी खाल्ल्याने तो प्रचंड सुस्तावला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने इतरांना सांगितले. हळूहळू तिथे ह्या अजगराला पाहायला गर्दी होऊ लागली. तेव्हा स्थानिकांपैकी एकाने शिवदुर्ग टीमला याबाबत कळवले. त्यानंतर शिवदुर्ग मित्रचे सुनिल गायकवाड आणि वन्यजीव रक्षक मावळचे निलेश गराडे ह्यांनी तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले.
त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या सदस्यांनी तिथे धाव घेतली. तेव्हा त्यांनी पाहिले की अजगर सुस्थितीत होता, पण वाढती गर्दी आणि परिसरातील आदिवासींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजगराला तिथेच सोडून देणे ठिक नव्हते. त्यामुळे रेस्क्यू टीमने अजगराची तिथून सोडवणूक करत त्याला दूर जंगलात सोडून दिले.
नागरिकांनी पावसाळ्यात अधिक काळजी घ्यावी. साप अथवा अजगर वगैरे परिसरात आढळून आल्यास वनविभाग किंवा वन्यजीव रक्षक, शिवदुर्ग मित्र ह्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केले. शिवदूर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची टीम, वन्यजीव रक्षकचे अध्यक्ष अनिल आंद्रे, जिगर सोलंकी, दक्ष काटकर, यश वाडेकर, तेजस केदारी, बबल्या मुऱ्हे, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे आणि स्थानिक मित्र आदींचा अजगर रेस्क्यूत सहभाग होता. ( 15 Foot Python Snake Rescue In Boraj Village of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें! परंदवडी इथे तब्बल 8000 वृक्षांची लागवड
– मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध; वडगाव मावळ शहरात ट्रायबल फोरमकडून भव्य मोर्चा
– निला केसकर ह्यांचा कार्यपूर्ती गौरव सोहळा; सेवानिवृतीनंतर नवीन ध्येय प्राप्त करण्याचा शुभारंभ होतो – संतोष खांडगे