सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता असते. मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार वाढू नयेत म्हणून वडगाव नगरपंचायत वतीने संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण फवारणीस सुरूवात करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी आपापल्या घरात पाण्याचा जास्त साठा करून ठेवू नये. तसेच घराजवळील परिसरात स्वच्छता ठेवावी. कुणाला काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास वडगाव नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे, तसेच मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, आरोग्य सभापती राहुल ढोरे यांनी नागरिकांना केले आहे.
पावसाळ्यात घराशेजावळील मोकळ्या जागेत पाण्याचा साठा जास्त काळ राहिल्यास मलेरिया, डेंग्यू यासारखे अन्य साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत असतात. याचा तत्काळ उपाय तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव नगरपंचायत माध्यमातून विविध उपाययोजना म्हणून प्रथमतः निर्जंतुकीकरण फवारणी सुरू करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात कातवीसह नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रभागात औषधी फवारणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली. ( Disinfectant Spraying In Whole City By Vadgaon Nagar Panchayat Said Mayor Mayur Dhore )
वडगाव शहरात सौर हायमास्ट दिवे…
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष पाठपुराव्याने तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 63 लाख रुपयांतून वडगाव शहरातील विविध भागांत जवळपास 40 सौर हायमास्ट दिवे बसविण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रत्यक्षात कामे सुरू असताना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी विविध भागांत अधिकारी व कर्मचारी यांना पाहणी करताना अत्यावश्यक सूचना केल्या. आठवड्याभरात सौर उर्जेचे सर्व दिवे उभारून पूर्ण होणार आहेत. नगरपंचायत वर येणारा लाईट बीलचा ताण या सौर ऊर्जेच्या दिव्यांमुळे कमी होण्यास हातभार लागणार आहे. तसेच पुढील टप्प्यात अजून काही सौर दिवे बसविण्यात येतील हा विश्वास नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– साते – मोहितेवाडी काँग्रेस (आय) कमिटीच्या अध्यक्षपदी अंतोष मालपोटे । Maval Politics News
– रस्त्याच्या बाजूला त्याला पाण्यात काहीतरी दिसले, निरखून पाहिले तेव्हा शॉकच बसला! 15 फुटी अजगर मस्तपैकी…
– बेकायदा पार्किंग ते चौकाचौकात सीसीटीव्हीची गरज; मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट । Vadgaon Maval