द कॉर्बेट फाऊंडेशन, एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वन विभाग पुणे यांच्या सहकार्याने “सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम” अंतर्गत वन भवन पुणे इथे 140 फॉरेस्ट कीटचे वाटप करण्यात आले. द कॉर्बेट फाऊंडेशन मुंबई चे संचालक केदार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) रोजी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे वन विभागातील सीसीएफ प्रवीण नायर हे होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आपल्या अध्यक्षीय मनोगतात नायर यांनी, द कॉर्बेट फाऊंडेशन आणि एचडीएफसी बँक परिवर्तन यांनी वडगाव, शिरोता वन परीक्षेत्रात केलेल्या वनतळी, वॉचटॉवर, वनबंधारा तसेच वन कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळा आदी कामांचे कौतूक केले. तसेच अशा उपक्रमातून वन विभागात वन परीक्षेत्रात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह, मनोबल वाढवण्यास मदत होते, असे सांगितले. तसेच यापुढेही फाऊंडेशन असे नवे उपक्रम राबवणार असल्यास वन विभागाचे सहकार्य राहिल, असे प्रतिपादन केले.
ह्या कार्यक्रमासाठी शिरोता वन परिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वडगाव वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, द कॉर्बेट फाऊंडेशनचे प्रकल्प प्रबंधक श्रीदत्त जाधव, प्रकल्प समन्वयक योगेश मगदुम, समन्वयक हरीदास सरोदे, महादेव मोहिते (डीसीएफ), मयूर बोते (एसीएफ) आणि वडगाव, शिरोता, भांबुर्डा आणि पौड येथील पदाधिकारी आणि वन कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना तुळशीचे रोप देऊन त्यांचे स्वागत तकण्यात आले.
यावेळी प्रकल्प प्रबंधक श्रीदत्त जाधव द कॉर्बेट फाऊंडेशन मुंबई आणि एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव आणि शिरोता संरक्षित वन परीक्षेत्रात झालेल्या विविध कामांची माहिती दिली. दीपक पवार (एसीएफ) यांनी उपस्थितांचे आभार मानले. आभार व्यक्त करताना त्यांनी, अशा नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी वन विभागातर्फे सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासित केले. ( distribution of 140 forest kits to pune forest department through corbett foundation and hdfc bank parivartan )
अधिक वाचा –
– शिवभक्तांना सुखद धक्का! तिकोना गडाला मिळाला ‘राजाश्रय’; तिकोनागड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात
– शिलाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह; महिंद्रा एक्सेलो कंपनीचा स्तुत्य उपक्रम । Maval News
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local