पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले काही तरुण भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” ही संस्था नियमितपणे चालवत आहेत. समितीच्या वतीने गेली कित्येक वर्षे आषाढी वारी सोहळ्याकरीता भक्तिमय वसा जपत विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदस्यांच्या संकल्पनेतून याही वर्षी महाराष्ट्रातील विविध भागांतून पुण्यात वास्तव्यास आलेल्या कित्येक वारकरी दिंडी प्रमुखांच्या हाती समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन “श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” सुपूर्द करण्यात आले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. ( Distribution of first aid kit to warkari on behalf of Devdarshan Yatra Samiti )
दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित आपल्या समितीचा नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. यास प्रतिसाद म्हणून आपला वारकरी सेवा संकल्प पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीच्या वतीने श्री. संपत शांताराम पवार यांनी सर्व दिंडी परिवाराचे आभार व्यक्त केले. येणाऱ्या काळातही असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे उपस्थित समिती सदस्यांनी नमूद केले.
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीत सफाई कर्मचारी क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्या, आता अर्ज करणे झाले सोपे, वाचा सविस्तर
– इंद्रायणी नदीवरील पूल, नवीन मतदार यादी, लाडकी बहीण योजना यांबाबत रवींद्र भेगडे यांचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval