वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार यांनी नायगाव येथील अस्थिव्यंग, अपंग मुलांची संस्था सोसायटी फाॅर एज्युकेशन ऑफ द क्लीपड (एस.इ.सी. सेंटर नायगाव) या संस्थेमधील मुलांबरोबर वाढदिवस साजरा केला. यावेळी वडेश्वर केंद्रातील कार्यरत असलेले गोकुळ लोंढे सर आणि इतर सर्व शिक्षक वृंद यांच्या विचारातून दिव्यांग मुलांसाठी रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ व वृक्षारोपणासाठी वृक्ष वाटप करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच वडेश्वर केंद्रातील शिक्षक गोकुळ लोंढे यांच्या विचारातून रघुनाथ मोरमारे, तानाजी शिंदे आणि इतर सर्व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खेळ घेतले आणि पारितोषिक वितरित करण्यात आले. तसेच अत्यावश्यक धान्य किराणा भेट म्हणून देण्यात आले. संस्थेचे स्टाफ तानाजी मराठे, शशिकला रणपिसे, कल्पना येवले, कदम मावशी व संस्थेचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी यावेळी उत्तम सहकार्य केले. ( distribution of grocery grains to disabled students on occasion of birthday by ravindra pawar )
यावेळी शिक्षकवृंदापैकी संदीप डोळस, सिद्धार्थ डोळस, संतोष डोळस, मनोज कदम, राहुल काळमेघ, रामेश्वर पवार, गंगाखेड वाघमारे, अर्जुन शिंदे, अंकुश मोरमारे, कुंडलिक लोटे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे कार्याध्यक्षपदी गणेश शेडगे यांची नियुक्ती
– मावळ तालुक्यातील दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप; गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान