भारतीय जनता पार्टी ( BJP ) तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग ( Disabled ) बांधवांना स्वावलंबन युडीआयडी ( Unique Disability ID ) कार्डचे वाटप करण्यात आले. पुढील काळात शहरातील उर्वरित दिव्यांग बांधवांना स्वावलंबन युडीआयडी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी दिव्यांग बांधवांना तळेगाव शहराचे शहराध्यक्ष रवींद्र माने यांनी मार्गदर्शन केले. तळेगाव शहरातील दिव्यांगांच्या पाठीशी भाजपा तळेगाव शहर सदैव उभी आहे, असे दिव्यांग बांधवांना त्यांनी आश्वासन दिले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत मिळणाऱ्या निधीतील पाच टक्के निधीतून दिव्यांग बांधवांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात. शासनाच्या सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी स्वावलंबन युडीआयडी कार्डचा उपयोग होणार आहे. दिव्यांग बांधवांना मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ भेटल्याबद्दल पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून धन्यवाद मोदीजी म्हटले, याची माहिती यावेळी सोशल मीडिया संयोजक सागर शिंदे यांनी दिली. ( Distribution of Unique Disability ID Card to Disabled People By BJP In Talegaon Dabhade )
कार्यक्रमाला मावळ तालुका दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, माजी नगरसेवक सचिन टकले, सरचिटणीस रविंद्र साबळे, सरचिटणीस प्रमोद देशक, स्वप्नील भेगडे, सतिश पारगे, तळेगांव दाभाडे शहर भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष अशू पाठक, तळेगांव दाभाडे शहर भाजपा जेष्ठ कार्यकर्ता आघाडीचे अध्यक्ष अनिल वेदपाठक, तळेगांव दाभाडे शहर भाजपा ओबीसी मोर्चाचे सोशल मीडियाचे अध्यक्ष अमित भागीवंत, जेष्ठ कार्यकर्ता आघाडीचे सरचिटणीस नाना गुंजाळ, तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टी विविध आघाडीचे, मोर्चाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा –
– हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये, हिंदू समिती कामशेतचे विक्रेत्यांना आवाहन
– वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे शंकर भोंडवे, निवडीनंतर जंगी मिरवणूक