पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने आणि पोटोबा देवस्थानच्या विश्वस्त सुनिताताई कुडे यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश मिळाले आहे. द्वारकाधीश लाॅन्स वडगाव मावळ इथे दिनांक 23 डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. 13 ते 15 वर्षे गटाखालील मुलामुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंकडून पदकांची लयलूट;
13 वर्षे वयोगटाखालील विजेते खेळाडू,
विघ्नेश शिंदे – रौप्यपदक
प्रीती दुडे – सुवर्णपदक
आदिती गायकवाड – रौप्यपदक
चैतन्य फाटक – रौप्य पदक
15 वर्षे वयोगटाखालील विजेते खेळाडू,
प्रीती दुडे – रौप्य पदक
तपस्या मते – सुवर्णपदक
वृंदा चांदगुडे – रौप्य पदक
रबिहा पाटका – रौप्यपदक
निशांत कंधारे – सुवर्णपदक मिळविले.
महत्वाचे म्हणजे शिवदुर्ग फिटनेसची खेळाडब तपस्या अशोक मते हिला 15 वर्षाखालील गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असा बहुमान देखील मिळला. हे सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस इथे अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. ( District Level Weightlifting Competition at Vadgaon Maval Shivdurg Fitness Club players get Success )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा
– अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता