महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन करण्यात आले आहे. चाकण उपविभागाच्या विभाजनातून चाकण एमआयडीसी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातही नव्याने स्थापित चाकण एमआयडीसी उपविभागांतर्गत वासुली आणि निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली गेली आहे. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण 36 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली असून मार्च महिन्यात ही कार्यालये सुरू होतील. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महावितरणच्या राजगुरुनगर विभागामध्ये सध्या चाकण, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ आणि राजगुरुनगर असे पाच उपविभाग आहेत. यात चाकण उपविभागांतर्गत एकूण पाच शाखा कार्यालये आहेत. चाकण उपविभागातील 1 लाख 13 हजार ग्राहकांमध्ये चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे 7 हजार 800 उच्च व लघुदाबाचे उद्योग आहेत. (Division of Chakan Subdivision from Mahavitaran)
चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील प्रामुख्याने किंग्फा व युंदाई 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन गेल्या डिसेंबरमध्ये एकाचवेळी कार्यान्वित करण्यात आले आहे.
आता चाकण उपविभागाचे विभाजन करून नवीन चाकण एमआयडीसी उपविभाग तयार करण्यात आला आहे. नव्या रचनेत पूर्वीच्या चाकण उपविभागात (कंसात ग्राहकसंख्या) चाकण शहर (27,654), भोसे (10,746), आळंदी शहर (23,759) आणि आळंदी ग्रामीण (8315) ही चार शाखा कार्यालये व एकूण 70 हजार 574 ग्राहकसंख्या असेल. तर नव्या चाकण एमआयडीसी उपविभागात चाकण ग्रामीण (19,163), वासुली (8206), निघोजे (14,934) हे तीन शाखा कार्यालय व एकूण 42 हजार 303 ग्राहक असतील.
चाकण एमआयडीसी उपविभाग कार्यालयासाठी उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे 6 पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद अशी 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या वासूली व निघोजे शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ असे प्रत्येकी 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत.
अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News
– विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा युवा सेनेच्या वतीने सन्मान । Pimpri Chinchwad
– महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज आणि जाखमाता देवी या भाऊ-बहिणीची भेट; ग्रामस्थांनी जपली 100 वर्षांपासूनची परंपरा । Vadgaon Maval